Breaking News

राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी-वड्रा भडकल्या, तुमच्या चमच्यांनी…. अदानी संसदेपेक्षा आणि देशाच्या जनतेपेक्षा मोठा झाला का, प्रियंका गांधी यांचा सवाल

मोदी आडनावाचे सगळेच चोर का असतात? अशी टीका केल्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा काल गुरूवारी सुनावली. त्यानंतर आज तात्काळ लोकसभा सचिवांनी या निर्णयाची दखल घेत राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जारी केला. या निर्णयावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसभा सचिवांनी राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी ट्विट करत म्हणाल्या, नरेंद्र मोदीजी, तुमच्या चमच्यांनी एका शहिद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर असे संबोधले, तर तुमच्या एका मुख्यमंत्र्याने थेट राहुल गांधी यांचे वडील कोण ? असा प्रश्न उपस्थित केला याची आठवण नरेंद्र मोदी यांना कारून दिली.

काश्मीरी पंडीतांच्या रिती रिवाजानुसार एका मुलाने वडीलांच्या मृत्यूनंतर पगडी परिधान करत आपली परंपरा कायम ठेवली. संसदेत संपूर्ण परिवार आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत वह नेहरू नाम क्यों नही रखते… असे म्हणालात. त्यावेळी कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेने अपात्र ठरविले नाही अशी संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी थेट मोदींना केला.

तसेच राहुल गांधी यांनी सच्चा देशभक्ताप्रमाणे अदानीकडून करण्यात येत असलेल्या लूटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी वर प्रश्न उपस्थित केला. तुमचे मित्र अदानी हे काय देशाची जनता आणि संसदेपेक्षा मोठे झाले का? की त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लुटीबाबत प्रश्न विचारला म्हणून तुम्ही बावचळले का? असा खोचक सवालही प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, पण तुम्ही हे लक्षात घ्या की याच घराण्याने भारतातील लोकशाहीसाठी आपले रक्त सांडले असल्याचे संतप्त प्रत्युत्तरही नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रियंका गांधी-वड्रा यांनी दिले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *