Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर अरे जाऊ द्या रे.....

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट ही आपण पाहिली आहेच. त्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात येतो आहे. तसंच दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकाही होते आहे. अशात आदित्य ठाकरेंनी एक गंभीर आरोप एकनाथ शिंदेवर केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या सगळ्यावर एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देऊन विषय संपवला.

हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला.

यानंतर आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचे नेते टीका करताना दिसत आहेत. तसंच एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेच रडले होते असं भाजपाचे आमदार नितेश राणेंनीही म्हटलं आहे. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विचारलं असता त्यांनी एका वाक्यात विषय संपवला आहे. आदित्य ठाकरे काहीही बोलले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याला फारसं महत्त्व देत नाहीत. आदित्य ठाकरेंनी एवढा मोठा गौप्यस्फोट केला तरीही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात विषय संपवला.

आदित्य ठाकरेंनी तुमच्यावर आरोप केला आहे की, भाजपात गेलो नाही तर अटक होईल, ते रडले होते. त्या विषयी काय सांगाल? असं पत्रकारांनी विचारलं असता, “अरे ते जाऊ द्या रे.. आदित्यचा विषय, तो लहान आहे अजून.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विषयच संपवला.
याआधीही आदित्य ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं होतं की आदित्य ठाकरेंचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतो आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याला फार महत्त्व देऊ नका. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या दाव्याचा विषय एकाच वाक्यात संपवला.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *