Breaking News

अजित पवार म्हणाले, मेळ बसतयं का पहा नाहीतर अजित पवार आडवा आला तरी उचला डिवायएसपींना दिले आदेश

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रसंगी आपले पदही बाजूला ठेवून नागरीकांसाठी प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वश्रुत आहेच. मात्र आपल्याच मतदारसंघात नागरीकांच्या वादावर अजब तोडगा सुचविण्याचा अजित पवारांचे वेगळेपण दाखवून गेले. झाले असे की एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमातंर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील आपल्या मतदारसंघात तेथील स्थानिकांशी त्यांच्या सभेच्या माध्यमातून संवाद साधत होते. नेमके त्याचवेळी एकाने भरसभेत जागेच्या मोजणीचा मुद्दा उपस्थित करत तोडगा काढण्याची मागणी केली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नसल्याची तक्रार थेट अजित पवारांकडेच केली. त्यावर संतापलेल्या अजित पवार यांनी थेट डिवायएसपींना आदेश देत म्हणाले, यांची एकत्र बैठक घेवून मेळ बसतोय का पहा. आणि या प्रकरणात अजित पवार जरी आडवा आला तरी त्याला उचला अशी ताकिद दिली.

त्यानंतर एका व्यक्तीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले पण त्याचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना सूचना देत असतानाच एका व्यक्तीने पालखी मार्गाची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार करत भर घातली.

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, कोणाच्याही भावना न दुखवता सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने आपण सर्वजण रहात आलो आहोत. न्यायालयाने भोंग्यासंदर्भात जे अटी व नियम घालून दिले आहेत, त्यानुसार आपल्याला पुढे जावे लागेल. मात्र भोंग्यावरून एकमेकांबाबत आकरस, गैरसमज, जातीभेद करून चालणार नाही. ही आपली संस्कृती-परंपरा नाही, आपल्या वडीलधाऱ्यांची ही शिकवण नाही. आपली राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करतात आणि तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात अशा राजकारणामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *