Breaking News

भाजपाने घेतला या मंत्री आणि आमदाराच्या मतदानावर आक्षेप पण… निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला आक्षेप

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अखेरपर्यंत २८१ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र भाजपाने मतपत्रिका एकालाच दाखविण्याऐवजी अनेकांना दिसेल असे दाखविल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांवर आणि एका आमदारावर आक्षेप घेतला.

महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात होते. भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारावराच्या मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. काँग्रेसच्या आमदार तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा नेते पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी केला.

संबंधित आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची मतं अवैध ठरवावी, अशी मागणी भाजपा नेते पराग अळवणी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी पराग अळवणी यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत झालेलं सर्व मतदान वैध पद्धतीने झाल्याचेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदान झाल्यानंतर मतपत्रिका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतदान केल्यानंतर जयंत पाटलांकडे मतपत्रिका दिली. असाच प्रकार शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्याकडूनही झाला.

खरंतर, मतदान करताना प्रत्येक पक्षाच्या आमदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. यावर भाजपानं आक्षेप घेतला आहे. स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होतं, असा आरोप भाजपाने केला.

पण आतापर्यंत झालेली सर्व मतं वैध असल्याचं म्हणणं निवडणूक अधिकाऱ्यांचं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मतदान होत असताना अशाप्रकारे आक्षेप घेण्याचा अधिकार सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना असतो, मात्र आतापर्यंत सर्व मतं वैध पद्धतीने झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *