Breaking News

सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आवाहन, अमित ठाकरेंनी पहिल्यांदा हनुमान चालिसा म्हणावी आम्हाला ''बी टीम'' म्हणणाऱ्यांनी पहाटेचे सरकार स्थापन करून स्वतःची विश्वसाहार्ता धोक्यात आणली

अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणत त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नको, जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही असा उपरोधिक टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मनसेला लगावत माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती असल्याचेही ते म्हणाले.

तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या मात्र तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणाऱ्या दंगलीवर उभा करू नका असे आवाहन करत दंगली झाल्या तर कोणाला अटक याबाबत संभ्रम नको अशी विनंतीही त्यांनी राज ठाकरे यांना केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ युवानेते सुजात आंबेडकर यांची पहिली वाहिली राजकीय सभा आज राहुल नगर नंबर १ येथे पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्ताराबद्दल माहिती देत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, वंचितांची सत्ता स्थापन करायची असेल तर खूप जास्त मेहनत करावी लागेल. घरोघरी जाऊन आपला संपर्क वाढवला पाहिजे. वंचितची भूमिका बाळासाहेबांची भूमिका ही नेमकी काय आहे? एक निवडक घटक सोडला तर इतर कोणत्या घटकांसाठी आहे याचा देखील प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मागील दोन निवडणुकांमध्ये आपण पहिले फक्त आपल्या समाजातील ताकदीवर निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समजतील मतदाता जोडता आला पाहिजे. त्या परीने प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपला समाज सोडून इतर समाजातील तीन व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचा मतदाता म्हणून तयार करा. पुढच्या निवडणुकीत अपयशाचं हे चित्र नक्की पालटलेलं असेल. प्रस्थापित पक्ष हे सिंडिकेट राजकारण करून वंचित वर्गाला वंचितच ठेवण्यात धन्यता मानत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे याचा प्रत्येकाने विचार करावा अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

लाटेवरती स्वार होऊन कोणीही निवडणूक जिंकू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यंदा आपल्या निवडणूक निव्वळ जिंकायची नसून मोठ्या प्रमाणात सत्ता देखील स्थापन करायची आहे. आपल्याविरुद्ध खूप अपप्रचार केला जाणार आहे. निवडणूका जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा, रिसोर्सेस, ताकद नाही मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे जिद्द तुमच्यातील जिद्द पक्षाची ऊर्जा म्हणून काम करणारी असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

लंडन मधील रॉयल हॅलोवे युनिव्हर्सिटीमधून शिक्षण एमएससी इन इलेक्शन कॅम्पेनिंग ॲण्ड डेमोक्रसी याविषयात शिक्षण संपादन भारतात आले आहेत. सुजात यांची मुंबईत झालेली ही भव्य रॅली होणार आणि पहिली राजकीय सभा आगामी निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून महत्वाची समजली जाते. याप्रंसगी मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, मुस्लिम बहुजन आघाडीचे सय्यद मंजूर, मुंबई निरीक्षक कलम खान, मुंबई महासचिव आनंद जाधव, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कृतिका जाधव, सतीश अमुलगे, तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, संध्या पगारे, प्रबुद्ध भारत उपसंपादक जीतरत्न पटाईत, राज्य सदस्य अक्षय बनसोडे, वॉर्ड अध्यक्ष शिंगोरे, वॉर्ड अध्यक्ष महिला दीक्षा शेगोकार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे -देवेंद्र फडणवीस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. या मतदानानंतर आता दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *