Breaking News

उध्दव ठाकरे यांचा टोला, पदव्या दाखवून नोकऱ्या मिळेना अन पदवी दाखव म्हटलं म्हणून दंड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून झालेल्या नाट्यावरून टोला

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, देशातील अनेक तरुणांना पदव्या दाखवून सुद्धा नोकरी मिळत नाही. दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवण्यास मागितली, तर २५ हजारांचा दंड ठोठावण्यात येतो. अशी कोणत्या महाविद्यालयाची पदवी पंतप्रधानांकडे आहे. महाविद्यालयाला अभिमान वाटला पाहिजे, आमच्या येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसला आहे, असं खोचक टोलाही लगावला.

मी आणि जयंत पाटील बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकलो. आम्ही मंत्री झाल्यावर आमच्या शाळेला अभिमान झाला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या महाविद्यालयात शिकले, त्यांना का वाटू नये. पदवी मागितली, तर दाखवणार नाही. विचारलं तर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो, हा कोणता न्याय आहे. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी करताय की काय?, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

जगातील सर्वात शक्तीमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यानंतर ही हिंदूना आक्रोश करावा लागतो. म्हणजे त्या नेत्याची ताकद काय कामाची. तुम्ही म्हणाला तो हिंदू, तुम्ही म्हणाल तो देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तो देशद्रोही… ही तुमची मस्ती असेल, तर तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ उभारली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Check Also

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *