Breaking News

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, तुमचाच रंग तपासून बघा मविआचे २५ आमदार बहिष्कार टाकणार होते पण सावरले

आज धुळवडीचा सण या सणाच्या दिवशीही राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरोप, टीका, टोले लगावण्याची एकही संधी न सोडता धुळवड साजरी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजच्या धुळवडी सणाचा संदर्भ देत भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, भाजपाले रोज तारखा जाहिर करून रंग उधळत असतात. पण त्यांचे रंग नकली असल्याचा टोला लगावला.

संजय राऊत यांच्या याच उपरोधिक टोल्याचा धागा पकडत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले असून शिवसेनेने ज्या दिवशी आमची साथ सोडली त्या दिवशी त्यांचा भगवा रंग गेला असून आता ते हिरव्याचे समर्थन करत असून केवळ उरलेली इज्जत वाचविण्यासाठी ते भगवा-भगवा करत असल्याचा टोला लगवात त्यांनी नेमका कोणाचा रंग भेसळ आणि खरा हे त्यांनीच तपासून पहावे असा पलटवार शिवसेनेवर केला.

निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा करत महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील असा दावा करत सध्या हे २५ जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता त्यांनी हिरवं पांघरून घेतले आणि ते हिरव्याचे समर्थन करतात. फक्त उरलेली इज्जत वाचवण्यासाठी सध्या ते भगवा-भगवा करत असतात. त्यामुळे भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी तपासून पाहावं. भेसळ एकट्याची होत नसते, तर दोन-तीन एकत्र आले की ती भेसळ होत असते अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी युती तोडली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे असेही ते म्हणाले. जालन्यात भाजपा कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *