Breaking News

मंत्री नारायण राणे म्हणाले, स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत अन् बढाया मारतात राज्यसभेच्या निकालानंतर केली टीका

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत एकट्या भाजपाला तीन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. परंतु या निवडणूकीत अंत्यत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा मात्र पराभव झाल्यानंतर भाजपामधील सर्वच नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले की, ती भाषा वापरल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रु झाली आहे. तसेच सत्तेत असूनही ते स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत अशी खोचक टीका केली.

वाचा

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सिंधुदूर्ग येथे आपल्या घरी आल्यानंतर ते बोलत होते. आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली अशी खोचक टीका त्यांनी केली.

वाचा

शिवसेना सांगत होती की तीन जागा जिंकणार पण शेवटी काय झालं? संजय राऊतदेखील काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळली नाहीत. मला सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात आलेले आहात. नैतिकतेचं भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूल व्हा अशी मागणी त्यांनी केली.

तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांच्यात लोकशाहीमध्ये जे नातं असतं हे नातं तुम्ही या निमित्ताने धुळीला मिळवलं. तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *