Breaking News

उध्दव ठाकरे यांनी ठणकावलं, जे मोदींनी धाडस केले नाही ते बिळातन बाहेर आलेले उंदीर करतायत भाजपाने आता त्यांचं हिंदूत्व स्पष्ट करावं

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेवर शाब्दिक हल्ला चढवला. तसेच भाजपाचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? असा सवाल केला. ते मंगळवारी ११ एप्रिल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे?

उध्दव ठाकरे म्हणाले, आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचार होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत आता भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली.

आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? कारण ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही. मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले.

एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

उध्दव ठाकरे म्हणाले, मी अयोध्येला गेलो असताना, राम जन्मभूमीसाठी विशेष कायदा करा, असे म्हटले होते. मात्र मोदींनी ते धाडस केले नाही. राम मंदिराचा निकाल न्यायालयाने दिला आणि हे बिळातंन बाहेर आलेले उंदीर हे त्याचे श्रेय घेण्यास पाहताहेत असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावत एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव करण्यासारखी गोष्ट आहे. लोकांनी विचार करायला हवा. अशा भरकटलेल्या लोकांच्या हाताममध्ये आपला देश, आपलं भविष्य किती दिवस ठेवायचा असा उपरोधिक सवालही उपस्थित केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *