Breaking News

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका

दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी उध्दव ठाकरे यांना आमच्यावर मर्यादा सोडण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा देत आमच्याकडेही बोलण्यासारखे बरंच आहे असं सूचक वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना इशारा दिला.

त्याचबरोबर योगेश कदम यांच्या मागे यापूर्वी मी मुख्यमंत्री नव्हतो पण आता आहे. योगेश कदम यांच्या मागे मी एकनाथ शिंदे म्हणून उभा आहे. यापुढे ते इतके काम करतील की समोरच्याचे डिपॉजिट जप्त करतील असे भाकितही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकणासाठी मोठं प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योगेश कदमचं प्रेम सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याला पाडण्याची हिंमत कुणामध्ये नाहीये. तो पुढच्या दीड वर्षांत एवढं काम करेल, की समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल. मंडणगडला एमआयडीसीची मागणी आहे. तातडीने एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला जाईल. तिथेही लोकांना रोजगार मिळेल. हे सरकार घेणारं नाही, तर हा मुख्यमंत्री देणारा आहे. देत देत आला आहे असेही सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात काजू-आंबा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ४ वर्षांसाठी १३७५ कोटींची तरतूद केली आहे. सिंधुदुर्गात मालवण-वेंगुर्ल्यात मार्केटिंग आणि ब्रँडिंगला आपण प्रोत्साहन देतोय. चक्रीवादळ आल्यानंतर विद्युत पोल, ओव्हरहेड लाईन तुटून पडतात त्यासाठी मदत-पुनर्वसनमधून २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काही देश पर्यटनावर चालतात. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं काम प्रलंबित आहे, तिथे मे पर्यंत एक लाईन आणि संपूर्ण रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी योग्य प्रयत्न करू अशी ग्वाहीही दिली.

रामदास कदम मंत्री असल्यापासून एकच धोशा होता की समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याचं काय. त्यावर आपण लवकरच निर्णय घेऊ. योगेश कदम पाठपुरावा करतायत तो खेड पोयनार प्रकल्पाला आपण मंजुरी दिली आहे. २४३ कोटींचा हा प्रकल्प आहे. न्यू मांडवेच्या प्रकल्पाबाबतही माझी चर्चा झाली आहे. तो प्रकल्पही तातडीने मंजूर केला जाईल. त्याबरोबर लघु आणि मध्यम प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करायला हवं. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचं पुनरुज्जीवन केलं जाईल. त्याला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. ४३ कोटींची खेड नळपाणी योजना आपण मंजूर केली आहे. मरीन पार्क आपण मंजूर करत आहोत. कुणबी भवनासाठी २ कोटी, अल्पसंख्याक सामाजिक भवन २ कोटी याला मी मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *