Breaking News

“या” कारणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करा

मागील पावसाळी अधिवेशना दरम्यान रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूकीची तारीखच निश्चित केली नाही. त्यामुळे गतवेळी अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही. त्यातच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान झालेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी अर्धवटच भाषण केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह यांची भेट घेतली.
यावेळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते. तसेच या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत निवेदन दिले.
राज्यपालांच्या भेटीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यपालांची भेट घेतली असून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी राज्यपालांकडून अद्याप तारीख निश्चित करण्यात आली नसल्याची बाब निदर्शनास आणून देत या अधिवेशनात निवडणूक घेण्यात येणार असून त्याबाबतची तारीख निश्चित करावी अशी विनंती केली.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अभिभाषणाच्या दिवशी भाजपाच्या सदस्यांनी केलेल्या घोषणांवरून राज्यपालांनी भाजपाला चांगलेच फटकारल्याचे सांगत विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्याबाबत आपण न्यायालयाच्या निर्देशांची वाट पाहू नये अशी विनंती केली. शिवाय विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीची तारीख निश्चित करण्यात यावी अशी विनंती केल्याचे सांगितले.

हे दिले निवेदनः-

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *