Breaking News

दिल्लीत शेवटच्या रांगेत मुख्यमंत्री शिंदे; रोहित पवार म्हणाले, हा मराठीजनांचा अपमान… नीती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनमध्ये शिंदेंना शेवटचे स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गर्व्हिनिंग कौन्सिलची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला उपस्थित राहीलेल्या ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांचे विरोधक असतानाही मात्र त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले.

नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठकीनंतर काढण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याने हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी दिली.

एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केले.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन बडे नेते वगळता जवळपास सर्वच राज्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *