Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट मोदींना सवाल, अदानी प्रकरणावर चर्चा का नको? अदानी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करतेय

गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक होऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, संसदेत गौतम अदानी प्रकरणावर नरेंद्र मोदींना चर्चा नको आहे. परंतु देशाला समजलं पाहिजे की, अदानीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ते दोन-तीन वर्षांपासून अदानीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, परंतु सरकारने त्यांचं काही ऐकलं नाही. संसदेत अदानी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करत आहे असा आरोपही केला.
राहुल गांधी म्हणाले की, मी या सरकारबद्दल सातत्याने बोलत आहे. संसदेत अदानी मुद्द्यावर चर्चा होईल याची या सरकारला भीती आहे. परंतु सरकारने यावर चर्चा होऊ दिली पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे की, सरकार यावर चर्चा का होऊ देत नाहीये. मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहे. हे सरकार चर्चेपासून दूर का पळतंय असा सवालही यावेळी उपस्थित केला.

अदानी प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावं यासाठी पक्षांनी संसदेच्या परिसरात निषेध नोंदवला. खासदारांनी यावेळी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. “अदानी-मोदी में यारी है, पैसे की लूट जारी है”, “एलआईसी बचाओ” आणि “नहीं चलेगी और बेईमानी, बस करो मोदी-अदानी” अशा प्रकारच्या घोषणा खासदारांनी संसदेबाहेर दिल्या. तसेच युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज देशभर आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *