Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, फडणवीस आरोपी नाहीत तर… फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणी आणि त्यासंबधीचा एसआयडीचा अहवाल अज्ञात लोकांनी चोरल्यानंतर तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहचला कसा याप्रश्नाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर टीम कडून फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठविण्यात आली. परंतु ती नोटीस त्यांना आरोपी म्हणून नाही तर ही कागदपत्रे कसे आली यावर जबाब घेण्यासाठी म्हणून त्यांना नोटीस पाठवित आली. परंतु त्यांनी उत्तर न दिल्याने आज पोलिस त्यांच्या घरी गेल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यावरून जी काही राजकीय धुराळा उडाला. त्यावरून राज्य सरकार आणि मुंबई सायबर पोलिसांची बाजू मांडण्यासाठी गृहमंत्र्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मार्च २०२१ ला पाच अज्ञान लोकांच्या विरोधात एसआयडीचा अहवाल आणि त्यासंदर्भातील तांत्रिक बाबी चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र तो अहवाल आणि तांत्रिक बाबी त्यांच्यापर्यत कशा पोहोचल्या याची माहिती घेण्याकरीता आणि याप्रकरणात फक्त त्यांचा जबाब घेण्यासाठी म्हणून त्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यांना यासंदर्भातील प्रश्नावलीही पाठविण्यात आली होती. परंतु त्यांनी त्याची उत्तरे दिली नाहीत. परंतु त्याचा ९-९-२१ रोजी पत्र आले होते की त्या प्रश्नांची उत्तरे मी लवकरच देत आहे. परंतु तरीही त्यांनी उत्तरे पाठविली नसल्याने अखेर पोलिस त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयडी  कार्यालयातून काही गोपनीय पत्रं आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. या प्रकरणी एकूण २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. फडणवीसांची साक्ष बाकी होती. म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतला. त्यात गैर काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घ्या. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे २६ मार्च २०२१ रोजी नोंद झाला आहे. टेलिग्राफ अॅक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा, ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये पाच अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला. २४ साक्षीदारांचे जवाब नोंदवले गेले आहे. ज्यांचा ज्यांचा संबध आहे त्यांचे जबाब घेणे बंधनकारक असल्याचेही आहे. फडणवीस यांना २१ ऑगस्ट २०२१ पहिली नोटीस दिली. दुसरी नोटीस ६ सप्टेंबर २०२१ रोजी, तिसरी ८ ऑक्टोबर २०२१ ला दिली, चौथी नोटीस १७ नोव्हेंबर २०२१ ला दिली होती. त्यानंतर एक नोटिस २३ मार्च २०२२ आणि ११ मार्च २०२२ ला दिली होती. एकूण पाच ते सहा वेळा नोटिस दिली. नोटीस याचा अर्थ समन्स नाही. फडणवीस यांनी पेन ड्राईव्हबाबत काही माहिती सभागृहात दिली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

धनंजय मुंडेचे आव्हान, आधी रेशीम बागेतील संघाच्या कार्यकारिणीत ठराव… सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा व मग आमच्यावर बोला

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडीवर खूप टीका करण्यात आली. आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published.