Breaking News

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांच्याकडून व्हिप जारी एकनाथ शिंदेसह सर्वांना बजावला व्हिप

राज्यात बंडखोर आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष पदासाठीची निवडणूक जाहिर झाली. यापार्श्वभूमीवर अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे राजन साळवी यांना या पदावर निवडूण आणण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व शिवसेना आमदारांना व्हिप जारी करत राजन साळवी यांना मतदान करण्याचे आदेश दिले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

खरंतर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बहुमत चाचणीसाठी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी गोव्यात सध्या मुक्कामी असलेले शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना मुंबईत आणण्यात येत आहे. तसेच या सर्व आमदारांना मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आणि येथेच भाजपा आणि या बंडखोर आमदारांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *