Breaking News

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस म्हणते, उजव्या विचारसरणीच्या भिंगातून… सचिन सावंत यांची राजभवनातील संग्रहालयाबद्दल प्रतिक्रिया

राज्यपाल भवनातील एका गुप्त बंकर आढळून आल्यानंतर या बंकरमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक निर्माण करण्याच्या उद्देशाने गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजची संकल्पना राबवित त्यांची काही छाय़ाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली. या गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजच्या दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या दालनात लोकमान्य टिळक, मदनलाल धिंग्रा, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, चापेकर बंधू यांच्यासह अनेकांची छायाचित्रे बसविण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीज च्या दालनावर स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (संघाचा सहभाग नसल्यामुळे) उजव्या विचारसरणीच्या भिंगातून दर्शविण्याचा प्रयत्न करत असल्याची खोचक टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत टीका केली.

राष्ट्रीय स्वंयसेवर संघ अनेक वर्षांपासून गांधीजींच्या नेतृत्वातील अहिंसक लढ्याचे महत्व कमी करण्याचा व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (संघाचा सहभाग नसल्यामुळे) उजव्या विचारसरणीच्या भिंगातून दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे. आज पंतप्रधान राजभवन येथे ‘गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीज’ या संग्रहालयाचे उद्घाटन करतील. मुख्य प्रवाहातील स्वातंत्र्यलढ्याला या संग्रहालयात स्थान दिलेले दिसत नाही. या लढ्यातही १९४२ च्या चलेजाव चळवळीप्रमाणे अनेक हुतात्मा झाले आहेत. दुर्दैवाने बाबू गेनूंचे नावही राजभवनच्या प्रेसनोटमध्ये नाही. श्रीपाद डांगे व इतर कम्युनिस्ट स्वातंत्र्यसैनिकही तुरुंगात गेले होते याची आठवण त्यांनी करून दिली.

डॉ. विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय तयार करण्यात आले असल्याने संघाच्या भिंगाचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे. राजभवन च्या प्रेसनोटमध्ये नमूद केलेल्या क्रांतिकारकांसह इतर सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानाला स्थान मिळावे अशी मनापासून अपेक्षा आहे. राजकीय अजेंड्यावर कोणालाही वगळले जाऊ नये. आशा आहे की ज्यांना अंदमानच्या कारागृहात शिक्षा झाली व ज्यांनी माफीनामे लिहिले नाहीत त्यांची नावे देखील असतील. महाराष्ट्राच्या अनेक क्रांतिकारकांनी काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

१८५७ चा विद्रोह हा हिंदू आणि मुस्लिमांचा एकत्रित लढा होता. सावरकरांनीही ते मान्य केले होते. म्हणून आम्ही १८५७ च्या बंडातील अझीमुल्ला खान यांच्यासह सर्व क्रांतिकारकांची नावे संग्रहालयात पाहू इच्छितो. शेतकरी-कामगारांचा संघर्ष आणि वारली उठाव यांनाही संग्रहालयात स्थान मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *