Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारला मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा विसर मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही

सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या दोन्ही पक्षांकडून महिला मंत्र्यांचा समावेशच करण्यात आला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय असल्याची टीका केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या अनुषंगान त्या फक्त होम मेकर नव्हे तर नेशन बिल्डर असाव्यात असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचाही शिंदे-फडणवीस सरकारला विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली.
आज ३९ दिवसानंतर शिंदे सरकारच्या १८ लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *