Breaking News

निवडणूक आयोगाच्या रिमोट व्होटींग मशिन्सवर विरोधकांचा आक्षेप आयोगाने केलेल्या प्रात्यक्षिकेनंतर विरोधी पक्षांचा विरोध

स्थलांतरित मतदारांसाठी तयार केलेल्या दूरस्थ अर्थात रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (आरव्हीएम) नमुन्याचे निवडणूक आयोगाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर केले. मात्र या प्रात्यक्षिकेनंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या मतदान यंत्रावर आक्षेप घेत या रिमोट व्होटींग यंत्राबाबत आक्षेप नोंदविला.

दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव अर्धवट असून ठोस नसल्यामुळे त्याला विरोध करण्याचा निर्णय बहुतांश विरोधी पक्षांनी घेतला आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

काँग्रेस, जद (यू), भाकप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स व झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर दिग्विजय यांनी हे वक्तव्य केले. या मतदान यंत्राच्या प्रात्यक्षिकासाठी आयोगाने आठ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि ५७ मान्यताप्राप्त राज्य पक्षांना सोमवारी सकाळी आमंत्रित केले.

‘दूरस्थ मतदानाच्या माध्यमातून देशांतर्गत स्थलांतरितांचा मतदानातील सहभाग वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यात आले आहे’, असे आयोगाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. यासोबत, या तंत्रज्ञानाच्या संकल्पनेचे टिपणही (कन्सेप्ट नोट) पक्षांना पाठवण्यात आले आहे.

दूरस्थ मतदान यंत्राला परवानगी देण्याबाबतच्या कायद्यात आवश्यक असलेल्या बदलांसारख्या मुद्दय़ांवर जानेवारी अखेपर्यंत आपली मते लेखी स्वरूपात देण्यासही पक्षांना सांगण्यात आले होते. या मुद्दयाशी संबंधित असलेल्यांशी चर्चा केल्यानंतर दूरस्थ मतदान लागू झाल्यास, स्थलांतरित मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या गृह जिल्ह्यात जाण्याची गरज उरणार नाही.

दूरस्थ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची मोजणी आणि त्याचे इतर राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना हस्तांतरण यांचे वर्णन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ‘तंत्रज्ञानविषयक आव्हान’ असे केले होते. दूरस्थ मतदान यंत्रांचा सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आधारावर ‘मजबूत, चूक न होणारे आणि स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा’ म्हणून विकास केला जाईल आणि ते इंटरनेटशी जोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

दूरस्थ मतदान यंत्राच्या प्रस्तावात फार मोठय़ा राजकीय विसंगती आहेत. उदाहरणार्थ, स्थलांतरित मजुरांच्या व्याख्येसारख्या बाबी स्पष्ट नाहीत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *