Breaking News

राज्यसभा निवडणूक निकालः आयोगाचा निर्णय काही येईना, सर्वांचा जीव टांगणीला भाजपाच्या आक्षेपावर निर्णय घेण्यास ५ तास उलटून गेले तरी अंतिम निर्णय नाही

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होवून ५ तास झाले तरी अद्याप मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणूकीतील उमेदवारांबरोबरच राज्यातील जनतेला कोण विजयी होणार याबाबतची उस्तुकता लागून राहिली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधी परवानगी मिळेल त्यानंतरच मतमोजणी होवून नेमके कोण पडेल, कोण जिंकले याचे गुपित उघडकीस येणार आहे.

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतदान करताना पोलींग एजंटशिवाय इतरांना मतपत्रिका दाखविल्याचा आरोप करत या तिघांचे मत बाद करण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात भाजपाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे केंद्र निवडणूक आयोगाने या निवडणूकी करण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रिकरणाची चित्रफीत मागवून घेतली आहे. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतला नाही.

मंत्री आव्हाड, मंत्री ठाकूर आणि सेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसनेही भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला. तसेच या दोघांच्या मतदानावर हरकत घेताना काँग्रेसने या दोघांची मते बाद कऱण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली.

यापार्श्वभूमीवर दोन्ही तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पडताळणी करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र पाच तास उलटून तरी अद्याप निर्णय झालेला नसल्याने नेमकी मतमोजणी होणार आणि निकाल कधी हाती येणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर जर निवडणूक आयोगाने भाजपाने घेतलेल्या आक्षेपानुसार जर या तिघांच्या मते बाद ठरविली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याकडून असे कोणतेही नियमबाह्य कृत्य झाले नसल्याचा दावा केला आहे.

तर गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी रात्री उशीरा प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी १२ ते १२.३० च्या दरम्यान विधानभवनात आलो. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. तेथून मतदानाच्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्याजवळचा कागद वाचला आणि हसलो. पुन्हा तो कागद खिशात टाकला. त्यानंतर मी मतपेटी जवळ जावून मतदान केले. या कालवधीत आमच्या पक्षाच्या पोलिंग एजंटाला मी कोणाला मतदान केले हे सांगितले. मी जर माझ्या पक्षाला कोणाला मतदान केले हे जर सांगितले नसते तर माझ्यावर कारवाई झाली असती असे स्पष्ट केले.

तर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाने आक्षेप घेतलेल्यानुसार असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला.

दरम्यान, सुरुवातीला भाजपाने ज्या गोष्टीसाठी आक्षेप घेतला. त्यावेळी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा निर्वाळ देत या तिघांचीही मते वैध असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर या तिघांची मते मतपेटीत टाकण्यात आल्याची माहिती विधानभवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *