Breaking News

अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर सोनिया गांधी गेल्या भेटायला पण मोदींनी… सोनिया गांधीकडे बघणेही टाळले

संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज अनिश्चित कालासाठी संस्थगित झाले. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी सर्वांना नमस्कार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिलेही नाही उलट त्यांनी दुसरीकडेच पाहणे पसंत केले.
ओम बिर्ला यांच्या दालनातील तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. साधारणतः अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी नेत्यांना जावून भेटून राजकारणा पलिकडे जावून एक सौहार्दाचे संबध जपण्याचा प्रयत्न करतात. संसदेत अशा प्रकारची एक अलिखित परंपरा राहीली असल्याचे सांगण्यात येत असून त्याच परंपरेप्रमाणे सोनिया गांधी या सत्ताधाऱ्यांना भेटायला गेल्या होत्या.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी हातजोडून भाजप नेत्यांना नमस्कार केला. राजनाथ सिंह यांनीही त्यांना नमस्कार दिला. मात्र, सोनिया गांधी नमस्कार करत असताना मोदींची नजर खालीच होती. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज सोनिया गांधी यांच्याशिवाय समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव, टीआर बालू, फारुख अब्दुल्ला आणि अधीर रंजन चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्विट करत लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर संसदेची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि चर्चा आणि संवादाचा स्तर अधिक उंचावण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असं सर्व नेत्यांना सांगितलं. सर्व पक्षाचे नेते यासाठी सक्रिय सहभाग नोंदवतील याची आशा आहे असे ट्विट करत तो फोटोही त्यांनी शेअर केला.
कार्यक्रमाच्या एक दिवस आधी अनिश्चित काळासाठी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार संसदेचं अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालणार होतं. संसदेचं कामकाज सुरू होताच ओम बिर्ला म्हणाले की, या अधिवेशनाचं कामकाज १७७ तास ५० मिनिटे चाललं. यावेळी १८२ तारांकित प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *