Breaking News

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून स्वागत केले आहे. “हा विजय सर्वस्वी बैलगाडा शर्यतप्रेमींसह शेतकऱ्यांचा आहे, १२ वर्षांपासून सुरू असलेला लढा सर्वांच्या प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान आहे”, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या स्पर्धांकरिता सरकारने यापूर्वी केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला, याचे मोठे समाधान आजच्या निकालातून मिळाले असल्याचे नमूद करून, राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामवंत वकीलांची टिम उभी केली होती. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आजच्या निकालात प्रतिबिंबिंत झाले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीसंदर्भात ग्रामीण भागात मोठी आत्मीयता आहे. या स्पर्धेतून रोजगारही निर्माण होत असल्याने या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास मिळालेला हिरवा कंदील मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. खिल्लारी देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने हा निकाल पाठबळ देणारा ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *