Breaking News

सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही हे डोक्यात ठेवून कामाला लागा आज महागाई इतकी वाढलीय याबाबत लोकांना सांगा...केंद्र सरकारची पोलखोल करा - जयंत पाटील

प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला… आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा… या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खानापूर येथे केले.
सांगली जिल्ह्यातील खानापूर – आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.
आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी आपले सैन्य तयार ठेवले पाहिजे. त्यासाठी बुथ कमिट्यांवर आपल्याला भर द्या. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा. त्यांच्या सतत संपर्कात रहा, आपला संपर्क कसा आहे यावर यश असते असेही त्यांनी सांगितले.
आपली संघटना विचारधारेवर आधारीत पाहिजे. विचारधारेचा कार्यकर्ता पक्षासाठी निष्ठेने काम करतो असे सांगत जलसंपदा विभागाची जबाबदारी आपल्याला मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून पाण्यापासून सांगली जिल्ह्यातील कोणतेही गाव वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील, अविनाश पाटील, सदाशिव पाटील, बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवा नेते प्रतिक पाटील, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, बाळासाहेब पाटील, विनायक अण्णा, वैभव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पुजा लाड, प्रतिभा पाटील, अरुण आजबे, हणमंतराव देशमुख, किसन जानकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष निलेश पवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार, लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. कुमार शेडबाळे, खानापूर युवक तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, आटपाडी युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, खानापूरच्या महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा पाटील, आटपाडीच्या तालुकाध्यक्षा अश्विनी कासार, विटा शहराध्यक्षा लता मेटकरी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *