Breaking News

चप्पल घटनेवरून फडणवीस म्हणाले, ती माणसे चिल्लर तर नितेश राणेंचा NCP ला इशारा पोलिसांना फक्त २४ तास सुट्टी द्या मग कळेल

पुणे मेट्रोसह अनेक विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. मात्र पिंपरी-चिंचवड येथे काही कार्यक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जाताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल फेकून मारली. परंतु सुदैवाने फडणवीस हे गाडीत असल्याने चप्पल गाडीवर पडली. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ते जाऊ द्या सोडून द्या ती चिल्लर माणसे आहेत. त्यांच्या बद्दल काय बोलणार असा प्रतिसवाल करत यावर अधिक बोलण्याचे टाळले.

फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते राज्यात कसे फिरतात ते आम्ही बघू असा इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो. मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं, यानंतर भाजपाचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चप्पल फेकल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, २४ तास पोलिसांना सुट्टी द्या मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो असे म्हणत त्यांनी मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर बोट ठेवले.

तसेच आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणूकीचे युद्ध जिंकायचे असून मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता का गरजेची आहे हे लोकांना समजवून सांगा म्हणत त्यांना मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे तुम्हाला करायचे आहे अशा सूचना कार्यकर्त्याना त्यांनी केल्या. नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन बाळासाहेब ठाकरे नसते, भाजपची सत्ता आणि आरएसएस नसती तर हिंदुत्व टिकले नसते असेही ते म्हणाले.

मुंबईत ज्यावेळी १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाला त्यावेळचे क्षण कुणाला आठवत असतील तर नवाब मलिकांचा राजीनामा का आवश्यक आहे हे अनेक कळेल हे सांगत त्यांना मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर त्यांनी जे हातवारे केले त्यावरही राणे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काय हातवारे करत होते. थोडं पोलिसांनी बाजूला ठेवले असते तर आम्हीच कानफटीत मारली असती असे वक्तव्यही मलिकांच्या अटकेवर त्यांनी केले.

बाळासाहेबांनंतर खरी हिंदुहृदयसम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागेल. महाराष्ट्रातील पोलीस हतबल आहेत. त्यामुळे दाऊदबरोबर फिरणाऱ्यांना सलाम ठोकावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *