Breaking News

घराणेशाहीवरून काँग्रेसने दाखविला पंतप्रधान मोदी यांना आरसा मोदींना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देत दाखविला आरसा

२०१४ सालापासून काँग्रेसवर घराणेशाहीवरून गांधी घराण्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र यावेळी काँग्रेसने एका वृत्ताचा हवाला देत भाजपामधील २५ टक्के उमेदवार हे कसे घराणेशाहीतून आल्याचा आरसा दाखवित त्या घराणेशाहीबाबतचे उत्तर द्या अशी मागणीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका ट्विटद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल चढविताना काँग्रेसमधील घराणेशाही अर्थात गांधी घराण्याला टीकेचे लक्ष्य केले. तसेच परिवारवाद राजनितीही नही, बल्की हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला घोंटता है अर्थात घराणेशाही राजकारणातीलच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गळा घोटते अशी टीका केली होती. याच वाक्याचा आधारा घेत काँग्रेसने एका बातमीच्या आधारे २००९ साली घराणेशाही १२ टक्के उमेदवार भाजपाच्या तिकिटावर निवडूण आले होते. आणि हेच प्रमाण २५ टक्क्याच्या घरात असल्याची बाब नजरेसमोर आणली आहे. तसेच याप्रश्नी जनतेला उत्तर देण्याची मागणी केली.

घराणेशाहीवरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मोदी घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला जात असल्याचं बोलतात त्यांच्या पक्षात २००९ मध्ये १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातून होते. आता सद्यस्थितीत भाजपातील २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातील आहेत, असा आरोप काँग्रेसने केलाय. खोटं बोललं जात आहे. जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, असंही काँग्रेसने म्हटलं.

काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हणाले, भाजपाचे २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातून आलेत. अनेक केंद्रीय मंत्री देखील राजकीय घराण्यांमधून आले आहेत. असं असताना भाजपाने घराणेशाहीवर बोलणं समजण्यापलीकडचे आहे.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीवरील टीकेवर निशाणा साधला आहे. मोदींनी घराणेशाही राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचं वक्तव्य केलं होतं. हेच नमूद करत काँग्रेसने २००९ पासून आजपर्यंतच्या भाजपामधील घराणेशाहीची आकडेवारी सांगितली आहे.

काँग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २००९ मध्ये भाजपात १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील होते. हे प्रमाण वाढून आता सद्यस्थितीत २५ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील आहेत.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *