Breaking News

संजय राऊत म्हणाले, बंटी आणि बबलीसाठी पोलिस आणि शिवसैनिक समर्थ राणा दांमप्त्याच्या आव्हानावर राऊतांची टीका

मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करत राणा दांम्पत्याने आज मुंबईत पाऊल ठेवले. मात्र हनुमान चालिसा उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री बंगल्याच्यासमोर जावून म्हणणार असल्याचे जाहीर केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते म्हणाले, बंटी और बबली पोहोचले असतील तर पोहचू द्या. हे फिल्मी लोक होते. ही स्टंटबाजी, मार्केटींग करणं त्यांचे काम आहे. भाजपाला अशा मार्केटींग करणाऱ्या लोकांची गरज लागते अशी टीका केली.
हिंदूत्वाचे मार्केटींग करण्याची गरज नसल्याचे सांगत हिंदूत्व म्हणजे काय आहे याची माहिती आम्हाला आहेत. या श्रध्देच्या गोष्टी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आम्ही मुंबई, महाराष्ट्रात सर्व सण यांच्या आधीपासून साजरे करत आहोत. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही मुंबईत गुढीपाडवा, दसरा, रामजन्मोत्सव साजरे करत आहोत. हे काय आम्हाला शिकवत आहेत. यांना स्टंट करु द्या, काही हरकत नाही असेही त्यांनी सांगितले.
काही गुंगारे वैगेरे दिलेले नाहीत. मुंबईचे पोलीस, शिवसैनिक सक्षम आहेत. स्टंट करायचं ठरवलं असेल तर काही कारण लागत नाहीत. रामनवमी, हनुमान चालिसा, हिंदुत्व हे काय स्टंटचे विषय आहेत का ? पण भाजपाला सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार, स्टंटबाज यांची गरज लागत असून त्यांचा उपयोग करुन घेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी राणा दांमप्त आणि भाजपावर केली.
कोणाला स्टंटच करायचे असतील तर करु द्या, त्याने काही फरक पडणार नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईचं पाणी काय आहे याची अजून माहिती नाही. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालिसा वाचणं, रामनवमी साजरं करणं हे धार्मिक, श्रद्धेचे विषय असून नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. पण अलीकडे भाजपाने ही नौटंकी आणि स्टंट करुन ठेवलं असून त्यातील ही पात्रं आहेत. लोक यांच्या हिंदुत्वाला, नाटकबाजीला गांभीर्यानं घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.