Breaking News

संजय राऊतांचे ट्विट, OK. भाग सोमय्या भाग पोलिस समन्सनंतर सोमय्या पिता-पुत्र गैरहजर राहील्यावरून केली टीका

मागील काही दिवसात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत लक्ष केले. तसेच त्या विरोधात ईडीकडे तक्रारही दाखल केली. तर सोमय्यांवर पलटवार म्हणून संजय राऊत यांनीही युध्दनौका विक्रांतच्या बजावासाठी लोकांकडून जमा केलेल्या फंडावरून निशाणा साधला. तसेच यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली.

यासंदर्भात ट्रॉम्बे पोलिसांनी चौकशीसाठी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना समन्स बजाविले. परंतु या समन्सनुसार सोमय्या पिता-पुत्र हे चौकशासीठ हजर झाले नाहीत. तर त्यांच्या वकीलांनी पोलिसांना भेटून काही अवधी मागितला. यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रावर ट्विट करत टीका केली.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमैया भाग!!”

दरम्यान, या प्रकरणात अटकेची शक्यता असल्याने सोमय्या पिता-पुत्र दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सोमवारी, ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यांचे वकील, अधिवक्ता हृषिकेश मुंदरगी यांनी सांगितले की ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप फालतू आणि बिनबुडाचे आहेत असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

आयएनएस विक्रांतला वाचवण्याच्या क्राउड फंडिंग मोहिमेवरून शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. अशातच ट्रॉम्बे पोलिसांनी बुधवारी रात्री सोमय्या आणि नील यांच्याविरुद्ध ५७ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. यासंदर्भात राज्यपाल भवनकडे आरटीआय मार्फत विचारणा केली असता ही सोमय्यांनी तो फंड जमा केला नसल्याची माहिती उघडकीस आली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *