Breaking News

उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेची आठवण सांगत म्हणाले, जबाबदारी किती मोठी… रावते, देसाई पहिल्या पिढीचे

उभं राहून बोलू शकतो याअगोदर दाखवलय, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही ताज्याच असल्याचे सांगत जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आल्याची आठवण सांगत त्या क्षणाचे साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी माझे वय अवघए सहा वर्ष होते. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला अन् त्याचे पाणी माझ्या अंगावर उडाले. त्यावेळी लक्षात आलं नाही फार मोठी जबाबदारी आपल्यावर येणार आहे, किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही अशी शिवसेनेच्या स्थापनेची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगत तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काही आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. देसाई, रावते पहिल्या पिढीचे असून शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होतं. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी असून दोघांनीही रुसवे फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल वेस्ट इन हॉटेलमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आदी उपस्थित होते.

सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत. पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक असून एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही आहे. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. आज जी काही गर्दी दिसून येत आहे इतके आमदार शिवसेनेचे दिसायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त करत रमेश गेला कट्टर कार्यकर्ता होता असे सांगत रमेश लटके यांच्या निधनाबद्दल दु:खही व्यक्त केले.

आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झालं ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचं मत फुटलं ते सगळं आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय असेही ते म्हणाले.

नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वावर बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *