Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले; तुमचा माज महाराष्ट्रात चालणार नाही, आताचे राजकारण पावशेराचे शिवसेनेच्या ५६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते

विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या मतदान होणार असतानाच आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आलेला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उध्दव ठाकरे आज काय बोलणार याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आयोजित उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचा सत्तेचा माज महाराष्ट्रात चालणार नाही असा इशारा भाजपाला देत आताचे राजकारण पावशेराचे असल्याचा खोचक टोलाही विरोधकांना लगावला.

शिवाजी महाराजांनी वयाच्या १७ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी लिहिली. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळचं वापरा आणि फेका आणि मग ही लोक भडकणार नाही तर काय? तुम्हाला मत दिलं ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याच्या निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे असा खोचक टोला त्यांनी भाजपाचे नाव न घेता लगावत उद्याच्या निवडणूकीत शिवसेना आणि महाविकास आघाडी विजयी होणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल वेस्ट इन आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, आमदार आणि खासदारही उपस्थित होते.

अग्निपथ मुळे तरुण रस्त्यावर उतरलेत खरंतर हृदयात राम आणि हाताला काम असे चित्र देशात दिसायला पाहिजे होते. मात्र नेमके तेच चित्र आज देशात दिसत नसल्याचे सांगत काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकरी कायद्यावर हटून बसला एकवेळ मरू पण मागे हटणार नाही म्हणत ऊन, वारा, पावसात बसला. त्यातील काहीजण मृतही पावले. पण शेतकरी हटले नाहीत. मग अखेर सरकारलाच एक पाऊल मागे घ्यावे लागल्याचे सांगत आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. वचनही असेच दिले जे आपण करू शकतो आणि ती आश्वासनेही पूर्ण केली. अचानक योजना आणायची अग्निवीर नाव द्यायचं पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नोकरीचा पत्ता नाही असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

राज्यात सत्ता राहिली नाही राहीली तरी शिवसेनेने करून दाखविले आहे. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले. मला राज्य पाहिजे पण कारभार जमणार नसेल तर तुम्ही नालायक असा उपरोधिक टोलाही त्यांनी मोदी यांचे नाव न घेता लगावला.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *