Breaking News

मुस्लिम समुदायाच्या मोर्चावर संजय राऊत म्हणाले, दंगलींचा डाव देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यावरून अरब राष्ट्रांनी भारताबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावून निषेध केला. तसेच त्या वक्तव्यावरून भारताने माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना पदावरून काढून टाकत निलंबित केले. तर नवीन जिंदाल यांना ६ वर्षासाठी काढून टाकले.

त्याचे पडसाद अद्यापही उमटत असताना आज महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप केला. ते शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

या देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता. जगभरात आपला निषेध सुरू आहे, जगभरात आपली छी-थू होतेय. जगभरात अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी आणण्यात आली आहे. या देशात असं कधी झालं नव्हतं. भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप करत आजच्या मतदानानंतर सगळ्यांनाच हे आकडे स्पष्ट दिसतील, असेही ते म्हणाले.

तसेच राज्यसभा निवडणुकीच्या अगोदर काँटे की टक्कर, चुरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले होते हे चूकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदरांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्यात एक दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *