Breaking News

शिवसेनेचा आमदारच म्हणतो, मी भाजपाच्या पाठिंब्यावर आलो निवडून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला घरचा आहेर

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार असले तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे चित्र असून याचाच एक भाग म्हणजे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला घरचा आहेर देत या सरकारमध्ये आमचा कोणी करत नसून मी भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आल्याचे जाहीरपणे सांगितले.

यापूर्वीही त्यांनी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आणि विधानसभा निवडणूकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे जाहीर वक्तव्य करत ते असेच चर्चेत आले होते. त्यानंतर आज शहाजीबापू पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच भाजपाच्या पाठिंब्यावर निवडूण आल्याचे जाहीर सांगत पक्षाविरोधात नाराजी असल्याचा घरचा आहेर दिला.

राज्यातील मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदार संघातील एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात घेतले नसल्याचे सांगत माझं सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदाच निवडून आलोय. त्यामुळे मला आधीच गडबड करायची नाही, लांब बसायचं म्हणून सांगण्यात आलेय. पण ३०-३० वर्ष निवडून आलेल्या बबनदादा शिंदे सारख्या लोकांनाही संधी देण्यात येत नाही. आम्हाला नाही वाटत या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारतंय, घरची कोंबडी दाळ बरोबर अशी आम्हा सगळ्यांची अवस्था झालीय. गप्प बसायचं नाहीतर गावाकडे जायचं, एवढंच उरलंय अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त करत आपली नाराजी स्पष्ट केली.

दरम्यान, त्यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी भाजपाच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपाचे माझ्यावर सतत लक्ष होते. अडचण आहे का? असं विचारायला त्यांचे फोन यायचे अशी आठवणही त्यांनी सांगितली.

तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना भाजपासोबतच राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचा गौप्यस्फोटही करत या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा कोणी विचार करेल असे वाटत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *