Breaking News

अखेर सेना नेत्यांच्या पळापळीनंतर रामदास कदमांना विधान भवनात प्रवेश अण्टीजेन टेस्टनंतर मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दिला कदम यांना प्रवेश

मराठी ई-बातम्या टीम

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवसेना आमदार रामदास कदम यांनी नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजवून दिली. मात्र हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आलेलेल्या रामदास कदम यांना त्यांच्याकडे चाचणी अहवाल नसल्याने सुरक्षा रक्षकांनी अडवित विधान भवनात प्रवेश देण्यास नकार दिला. कदमांना अडविल्याचे वृत्त वेगाने विधान भवन परिसरात पसरले. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी धावाधाव करत रामदास कदम यांच्या विधान भवन प्रवेशाची व्यवस्था केली. त्यामुळे कदम यांना हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले.

रामदास कदम यांच्या विधान परिषद सदस्यात्वाची मुदत यात हिवाळी अधिवेशनात संपत आहे. त्यामुळे त्यांच्या या टर्ममधील शेवटचे अधिवेशन ठरणार आहे. या शेवटच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी रामदास कदम हे आज विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याने त्यांना रोखले.

त्यावर रामदास कदम यांनी लगेच शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून यासंबधीची माहिती दिली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तातडीने धाव घेत विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्याकडे आरपीसीआर चाचणीचा अहवाल नसल्याची बाब लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी कदम यांच्या अण्टीजेन चाचणी करण्याची व्यवस्था केली. आणि त्याचा अहवाल आल्यानंतर अखेर रामदास कदम यांना सोबत घेवून विधान भवनात आले.

वास्तविक पाहता रामदास कदम यांना विधान परिषदेवरील दुसरी टर्मसाठी शिवसेनेने त्यांना मुंबईतून उमेदवारी देण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी वरळीचे माजी आमदार सुनिल शिंदे यांना उमेदवारी देत निवडूणही आणले. आपली उमेदवारी केवळ परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामुळेच कापली गेल्याचा आरोप कदम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यात त्यांची टर्मही संपत आली असताना त्यांना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर रोखले गेले. त्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढविण्यात येवू लागले. परंतु त्यांच्याकडे केवळ आरपीसीआर चाचणीचा अहवाल नसल्याने रोखण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तर्क-वितर्कांच्या उधाणाला पूर्ण विराम मिळाला.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *