Breaking News

शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला खोचक सवाल, ही सत्ता स्वप्नातरी बघितली होती का? उपनेते तानाजी सावंत यांनी डागली तोफ

आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागते आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? असा खोचक सवाल करत केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचं तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळं चाखालयला मिळत आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करता, आम्ही का सहन करायचं?” असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाना साधत निधी वाटपावरून असलेली खदखद व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी सोलापूरात आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे टीका करत नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय असा इशाराही त्यांनी यावेळी या दोन्ही पक्षांना दिला.
२०१९ पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलेले दाखवावे असे आव्हान देत मी आता आमदरकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि मग कांड पिकवने ज्याला आपण म्हणतो, मग या पक्षाचा स्त्रोत कुठे आहे? यांचा चालेला घोडा कसा आवरायचा? पक्षाला खाली कसं आणायचं? विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेले. ते कुठेतरी आज या कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो, की तुम्ही आमचं का वाकून बघात तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. आम्ही ठीक आहोत, आमच्या सर्वांच्या श्रद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याचे ते म्हणाले.
आमच्या या ठिकाणी मागून काही मिळत नाही, रडल्याने काही मिळत नाही आमच्याकडे आदेश चालतो आणि आदेशाची वाट आमदार, खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. विषयच नाही, कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती, त्याने कधी ऊन, वारा, पाऊस किंवा काही साम, दाम मिळते की नाही याचा विचार केला नाही. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातील रग ही वेगळीच आहे, ती कुठल्याही पक्षाने आजमावण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ते पुढे बोलताना म्हणाले, नुकतचं आपले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेल आहे. मागील दोन-अडीच वर्षांमध्ये सर्व माध्यमं देखील दाखवत आहेत आणि आम्ही देखील सभागृहाच्या बाहेर बघतोय आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मग कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडामधील असतील आमच्या सगळ्यांची मानसिकता एक झालेली आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातून देखील प्रतिबिंबित झालेले आहे. विरोधी पक्षांनी ओरडायचे त्यांचे काम आहे त्यांना ते करू द्या. तथ्य काय आहे तर तथ्य हेच आहे. आज ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाते. जवळपास ३०-३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. शिवसेनला फक्त १६ टक्के बजेट दिले जाते. या १६ टक्के बजेट मधले आज उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरतीच सहा टक्के जातात, मग विकासासाठी काय? विकासासाठी केवळ १० टक्के, खेदाने व्यक्त करतो माझ्या मतदारसंघात असेल, उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा सोलापुर, यवतमाळच्या देखील जिल्हाप्रमुक संपर्क प्रमुखांचे मला फोन असतात, की त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील हसन मुश्रीफांकडे जाऊन एक-दीड कोटींची कामे घेऊन येतो आणि आपल्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, खासदाराचा तर विषयच येत नाही आणि मग शिवसेनेसाठी काय? नुसतच गोडगोड असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.
आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *