Breaking News

अली जनाब टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार, अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं… अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांची केली होती टीका

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे. या सभेपूर्वी ठाकरे गटाकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही उर्दू बॅनरदेखील आहेत. हे बॅनर पाहून एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. उध्दव ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने मालेगावात अनेक ठिकाणी अली जनाब उध्दव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब हे उद्धव ठाकरेंना शोभतं का? या लांगुलचालनाचं बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल, अशी खोचक टीका केली. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रत्युत्तर देताना म्हणाले, भाजपाकडून अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजे रोवण्यासारखं आहे अशा शब्दात पलटवार केला.

राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बोलण्यापूर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात त्या जनाबांना आधी सांभाळा. बाळासाहेबांचं आमच्यावर बारीक लक्ष आहे. आम्ही जे काम करत आहोत ते त्यांच्या प्रेरणेनेच करत आहोत असा खोचक टोलाही लगावला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मुस्लिम मतदारांवरून भाजपा बोलतेय पण त्यांना मुस्लिमांची मतं नको असतात का? मुस्लिम लोकही इथले नागरिक आहेत, तेही इथले मतदार आहेत. देशात २२ कोटी मुस्लिम नागरिक आहेत. त्यांच्याविषयी अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं रोवण्यासारखं आहे.

मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू बॅनर पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उध्दव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन जर उद्धव ठाकरे त्यांचं लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल. तसेच आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण लांगूल चालनाच्या विरोधात असल्याची टीका केली.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *