Breaking News

शिवसेनेचे प्रत्युत्तर, नवनीत राणा जरा तोंड सांभाळून……कोण आहात आपण ? शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणा याना फटकारले

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

नवनीत राणा जरा तोंड सांभाळून…… कोण आहात आपण “सी”‘ ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या…. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला….काय संबंध आपला हनुमान चालीसा शी….. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखती मध्ये आपल्याला देता आलं नाही… म्हणे मी हनुमान भक्त…. भाजपाच्या सी …..डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं…. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात…… ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती असा सवालही त्यांनी केला.

तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे….. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत…. बाळासाहेबांचे राहिले नाहीत….. पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबियांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील…. हे तुमच्यासारख्या “मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी “C” ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते….. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय

कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका… शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या १०० दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे….. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून…. असा पलटवारही त्यांनी केला.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *