बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व राजकिय पक्षांकडून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षियांकडून करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड हे सीआयडीसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर याप्रकरणी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकरी अद्याप पूर्णतः पकडले गेले नाहीत. तसेच या प्रकरणाची सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या काही राजकिय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मुंडे समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचे बाब उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
पुढे शरद पवार आपल्या पत्रात म्हणाले की, बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचेही यावेळी सांगितले.
शरद पवार पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणीही यापत्राद्वारे केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी… pic.twitter.com/utwEDgoKMQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2025