Breaking News

शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा

दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

पुढे बोलताना शरद पवार बोलताना म्हणाले की, दावोसमध्ये कालचे जे करार झाले, त्याच्यामध्ये भारत फोर्जशी करार झाला. भारत फोर्ज ही पुणे, कराडची कंपनी आहे. त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास तीन वर्षांपूर्वी घेतला होता. गडचिरोलीला जिंदाल या स्टीलच्या फॅक्टरी महाराष्ट्रात आहेच, आता रत्नागिरीत, नाशिक जिल्ह्यात आहे आणि तिथून दावोसवरून एक जाहीर केली. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे, त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणणं, असा एक देखावा केलेला दिसतोय अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यासोबत असणार आहेत. एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सहाजिक आपला पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. मी उदय सामंत यांचे विधान ऐकले. दावोस येथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की, पक्ष फोडण्यासाठी गेले होते? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता, त्याच्याशी सुसंसगत नव्हती. काही खासदारांचे फोटो मी पाहिले. तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील, असे मला अजिबात वाटत नाही. कारण हे लोक वाटेल ते करतील पण बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडे अमित शाह सतत जे काही बोलतात, त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे. अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील, अशी अपेक्षा असते. पण अमित शाह यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही. खरं म्हटलं, तर अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार काही वाटत नाहीत. त्यामुळे अमित शाह कोल्हापुरात शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहिती नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी अमित शाह यांना लगावला.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सतत सांगत असतात, भाजपाचे हिंदुत्व खरं नव्हे, ते पुन्हा एकदा त्यांनी काल सांगितलं. ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंची देखील काल सभा झाली. कार्यक्रम घेतला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपला अधिकार आहे असं दोघांनाही वाटतं. त्याची प्रचिती काल आपण पाहिली लोकांची उपस्थिती पाहिली, तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी होती’, असेही यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्यावी- संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं म्हटलं होतं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पाहत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे कांदा, सोयाबीन, कापूस, दुधाला हमीभावाचे देण्यासंदर्भात म्हटले होते त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा. महागाई आणि वित्तीय तूट वाढवणार असेल तर एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा काय उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातील वाघांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार ऑपरेशन टायगर राबवणार असेल तर चांगली गोष्ट आहे. लाडकी बहीण योजनेत बांग्लादेशी महिलांचे फॉर्म निवडणुकीआधी का दिसले नाही? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *