Breaking News

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिला गंभीर इशारा शेतकऱ्यांना अस्वस्थ होवू देवू नका अस्वस्थ पंजाबची एकदा किंमत मोजलीय

पुणे : प्रतिनिधी

पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी असा त्याग करणारा, अन्नधान्यात स्वयंपूर्णता करणारा हा घटक काही प्रश्नांवर आग्रहाने आंदोलनाला बसला असेल तर त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत

पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका. एकदा देशानं अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. ही किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिलीय असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला.

तसेच पंजाबमधील शेतकऱ्यांनी देशाच्या अन्न पुरवठ्यात सतत प्रचंड योगदान दिलंय आणि देशाच्या संरक्षणातही ते पुढे असल्याचं नमूद केलं. शेतकरी आंदोलनात सहभागी घटकांविषयी केंद्र सरकारची भूमिका समंजस असल्याचं दिसत नाही. आंदोलनात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग येथील जास्तीत जास्त लोक सहभागी आहेत. त्यातल्या त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमचं केंद्र सरकारला सांगणं आहे की, पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका.

पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय असेही ते म्हणाले.

दुसरीकडे पंजाबमधील शेतकऱ्यांनी मग ते शिख असो की हिंदू, त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्यात सतत प्रचंड योगदान दिलंय. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्ही मी महाराष्ट्रात भाषणं करतो, मात्र पंजाबचे लोक स्वतः लढायला असतात अशी आठवणही त्यांनी पंतप्रधान मोदींना करून दिली.

मागील ९ ते १० महिन्यापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून या केंद्र सरकारकडून आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनावर केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने गाडी घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर अन्य एका ठिकाणी भाजपाच्या खासदारानेही असाच प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच इतका गंभीर इशारा दिला.

त्याचबरोबर पवार यांनी राज्यातील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काहीजण प्रयत्नशील असून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाशिवायचे सरकार राज्यात असल्याने अस्वस्थ असल्याचे सांगत तुम्ही फक्त सरकार पाडण्याचे प्रयत्न करत रहा. तसेही सरकारने २ वर्षे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *