Breaking News

शिवसेनेला दुसरा धक्का सुभाष साबणेंनी सोडलं धनुष्यबाण आणि धरलं कमळ पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच साबणे यांना भाजपाकडून उमेदवारी

नांदेड: प्रतिनिधी

राज्यातील शिवसेना मंत्र्यांच्या विरोधात कागदपत्रे प्रतिस्पर्धी भाजपाच्या हातात सोपवून शिवसेनेसह महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याची घटना काल उघडकीस आल्यानंतर आज देगलूर येथील पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला असून येथील माजी आमदार सुभाष साबणे यांनी सेनेचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे त्यांचा भाजपामध्ये औपचारीक पक्षप्रवेश होण्यापूर्वीच साबणे यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केली.

देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला. ही जागा सध्या काँग्रेसकडे असल्याने या निवडणूकीसाठीही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मागील वेळी ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी शिवसेनेकडून काँग्रेसने खेचून घेत रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळविला.

त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यत आणि त्यात महाविकास आघाडीत युती व आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यत माजी आमदार सुभाष साबणे यांना संधी मिळणार नव्हती. मात्र इतका वेळ थांबण्याची तयारी आणि पुढील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर साबणे यांनी भाजपाची वाट धरल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुभाष साबणे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या त्रासामुळे आपण शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे सांगत सध्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साबणे हे उद्या सोमवारी अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साबणे यांना भाजपाने पोटनिवडणूकीत उमेदवारी जाहिर झाल्याबद्दल त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले.

शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे कथित पीए कर्वे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील कागदपत्रे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोहोचविल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संदोपसुदी उफाळून आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच आता साबणे यांनी शिवसेना सोडत भाजपामध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *