Breaking News

मंत्री परब यांना ईडीची नोटीस- राऊत म्हणाले, क्रोनोलॉजी को समज लिजीए जन आर्शिवाद यात्रेनंतर भाजपाचा पहिला पलटवार

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठविल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे आज दिली. तसेच क्रोनोलॉजी समज लिजीए एस लिहीत हा प्रकार नेमका समजून घ्यावा असे आवाहन करत कायद्याची लढाई कायद्यानेच लढू असे सांगत शिवसेना कायद्याच्या लढाईला तयार असल्याचे राऊत यांनी निक्षूण सांगितले.

भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई आणि कोकणात जन आर्शिवाद यात्रा आयोजित करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पाली येथे जन आर्शिवाद यात्रा पोहोचल्यानंतर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक करणारे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात महाड, नाशिक येथे गुन्हे दाखल केले. त्यापार्श्वभूमीवर राणे यांना अटक झाली. त्यावेळी रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब हे तेथील पोलिस अधिक्षकांशी फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राणे यांच्या अटकेमागे राजकारण असल्याचे चित्र निर्माण झाले.

या व्हिडिओच्या व्हायरल नंतर भाजपाकडून यासंदर्भाच सीबीआय चौकशीची मागणी करत अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वीच ईडीची नोटीस परिवहन मंत्री अनिल परब यांना मिळाल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये आणखी पुढे लिहितात शाब्बास, जन आर्शिवाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आहेत. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू…अशी तयारीही असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.