Breaking News

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले, स्वबळावर लढविणार कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने आघाडीतून नव्हे तर स्वबळावर निवडणूका

नुकतीच आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. त्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट संकेत दिले की, कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांनी आज दिली.

नेहमीप्रमाणे विद्यमान राजकिय परिस्थितीवर शिवसेना उबाठा पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. मात्र त्या दोन्ही निवडणूकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत होऊ नये यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

संजय राऊत पुढे बोलताना सांगितले की, मुंबई ते नागपूर पर्यंतच्या सर्व महानगरपालिका निवडणूका आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही यावेळी केली. संजय राऊत यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली की काय अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. तर या घोषणेनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत,

यावेळी संजय राऊत म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आम्ही आघाडी म्हणून लढविल्या. परंतु आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मुंबई ते नागपूरपर्यंतच्या महापालिका लढविणार आहोत. एकदा आम्हाला आमची ताकद आजमावयीची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व महानगरपालिकांमधील निवडणूका आम्ही स्वबळावर लढविणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संकेत दिले आहेत. त्यामुळे आमचा निर्णय होत असून मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल या सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, आघाडीत आणि विधानसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो, त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणूका स्वबळावर लढवून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात असेही यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्याचं म्हणणं खरं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती राहिली आहे. ती संस्कृतीही पाळलेली आहे. शेवटी राज्याचा विकास आणि जनतेचा विकास महत्वाचा असतो, पण व्यतीगत शत्रुत्व बाळगंल गेलं नाही पाहिजे. पण दुर्दैवाने भाजपाने शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा सुरु ठेवली असल्याची आठवणही यावेळी करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *