Breaking News

संभाजी छत्रपतींनी शिवसेनेकडे पाठ फिरविल्यानंतर “या” दोन नावांची चर्चा उर्मिला मातोंडकर किंवा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढत देणाऱ्या संभाजी राजे यांना रितसर पक्षात प्रवेश घेऊन निवडणूक लढविण्याचा पर्याय शिवनेने दिलेला असतानाही शिवसेनेच्या ऑफरकडे पाठ फिरविली. त्यानंतर शिवसेनेकडून दोन नावांची चर्चा सुरु झाली आहे. त्यातील शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा औरंगाबदचे कट्टर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याबाबत विचार शिवसेनेकडून देण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
छत्रपतींच्या धाकल्या गादीचे (कोल्हापूर) वारस युवराज संभाजी छत्रपती गेला आठवडाभर नरिमन पॉइंटच्या ट्रायडंट हॉटेलात तळ ठोकून होते. रविवारी संभाजी राजेंना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उधअदव ठाकरे यांनी स्वस्त फोन करून उद्या दुपारी १२ वाजता वर्षा निवासस्थानी या आणि हाती शिवबंधन बांधून आणि उमेदवारी घेवून जा अशी थेट ऑफर संभाजी राजे यांना दिली. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेच्या या ऑफरला सपशेल नाकारात आज सोमवारी पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ऑफरला संभाजी राज्यांनी नकार देत थेट कोल्हापूर गाठल्याने संभाजी राजे हे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची ऑफर संभाजी राजे यांनी नाकारली. तर त्यांच्याऐवजी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याप्रमाणे सक्रिय असलेल्या नेत्यास उमेदवारी देण्याबाबत विचार करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय उर्मिला मातोंडकर यांच्याऐवजी शिवसेनेचे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याची चर्चा सुरुकेली.
सध्या राज्यसभेत यांच्याबाबतही लोकसभेत १८ आणि राज्यसभेत २ सदस्य आहेत. संजय राऊत यावेळी पुन्हा निवडले जाणार आहेत. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेने अपक्ष व मित्रपक्षांच्या साथीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसे झाल्यास संसदेत शिवसेनेचे २२ इतके संख्याबळ होईल. ज्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सेनेला महत्व येईल. ३१ मे हा राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांना निवडणूकीचे तिकिट देण्या ऐवजी उर्मिला मातोंडकर यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याबाबतचा आग्रह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत धरला आहे. तसेच शिवसेनेला सध्या अशाच व्यक्तींची गरज असून जे शिवसेनेची बाजू संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर मांडतील आणि त्याला एकप्रकारे ग्लॅमर मिळवून देतील अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी मांडली.
आदित्य ठाकरेंच्या आग्रहावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी लॉबिंग चालवली आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खैरे उमेदवार योग्य असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
देशात अन दिल्लीत शिवसेनेचा चेहरा बनणाऱ्या व्यक्तीस उमेदवारी द्यावी, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकरचे पारडे जड आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *