Marathi e-Batmya

धनंजय मुंडे यांचा हाती पिस्तुल… अंजली दमानिया म्हणाल्या, यातून काय आदर्श घेणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील संबधही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी हाती पिस्तुल घेत एक इन्स्टाग्रामवर रिल रिलीज केल्याची नवी धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. तसेच तो रिल दाखवत अंजली दमानिया म्हणाल्या की, असले इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहुन नवी पिढी काय आदर्श घेणार असा सवालही एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील सहभागी गुन्हेगारांना सोडले जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतर विविध प्रसारमाध्यमांशी बोलतानाही अशीच घोषणा केली. परंतु संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी भागवत कराड यास मंत्री धनंजय मुंडे यांचे संरक्षण असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील आर्थिक संबध आणि घनिष्ठ संबधाचे पुरावेही अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले.

अंजली दमानिया यांनी आज त्यांच्या एक्स च्या ट्विटर प्रोफाईलवर दोन व्हिडिओ पोस्ट केल्या असून यातील एका व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे एक गाडी चालवित आहेत. तर त्यांच्या शेजारी वाल्मिकी कराड बसलेला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओ कम रिलमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तुल घेऊन उभे असल्याचे दिसून त्या व्हिडीओ एक गाणंही वाजत असल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडीओ दोन व्हिडीओसोबत अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून असे व्हिडीओ पाहुन पुढची पिढी काय आदर्श घेणार असा सवाल करत कष्ट न करता हाती पिस्तुल दाखवून पैसे कमावणे हे सोपे असेच वाटते. आपला देश असा असणार आहे का , देशाबद्दल हे व्हिजन असे असणार आहे का अशी प्रश्नांची सरबतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून यांना केली.

तसचे पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा अशी मागणी करत गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Exit mobile version