Breaking News

सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतातील सगळ्यांचा डिएनए एकच केंद्रातील मोदी सरकारवर संघाचा कंट्रोल नाही

मराठी ई-बातम्या टीम

मागील ४० हजार वर्षापासून भारतातील सर्वांचा डिएनए सारखाच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचालक मोहन भावगत हे सध्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. धर्मशाळा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर १४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आपल्या परंपरेत पूर्वी काढा घेतला जायचा. आता सर्व जग हेच भारतीय मॉडल स्वीकारत आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनला नाही तरी विश्व गुरु नक्कीच बनू शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील अनेक वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कंट्रोल असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत असते, त्यावर बोलताना भागवत म्हणाले की, मोदी सरकारवर संघाचा कोणताही रिमोट कंट्रोल नाही. तसेच प्रसार माध्यमांच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करत सरकार आमच्या स्वंयसेवकांना कोणतेच आश्वासन देत नसल्याचे सांगितले.

त्याचबरोबर आम्हाला सरकारकडून काय मिळालं असे विचारले जाते, पण लोकांना मी सांगू इच्छितो की आमच्याकडे जे काही आहे ते आम्ही गमावू शकतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या वक्तव्यातून नेमका त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता की अन्य नेत्यांकडे याबाबत स्पष्टता आली नाही.

भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला आहे. कारण लोक एकजूट नव्हते असे सांगत त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान उद्धृत करत म्हणाले की, आपण कोणत्याही शक्तीमुळे पराभूत होत नाही. तर आपल्यातीलच कमकुवतपणामुळे पराभूत होत असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *