Breaking News

रामदास आठवले यांची मागणी, विजयस्तंभासाठी २०० एकर जमीन आणि २०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी करणार

भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता १ जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची २०० एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पुणे येथील भिमा कोरेगाव येथील ऐतिहासीक विजय स्तंभास ना.रामदास आठवले यांनी १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनम्र अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले बोलत होते.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सरचिटणीस गौतम सोनावणे, संघटन सचिव परशुराम वाडेकर, सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण, आशिष गांगुर्डे, मुंबईतुन आलेले प्रकाश जाधव, सोहेल शेख, आदी अनेक मान्यंवर उपस्थित होते.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, १ जानेवारी १८१८ साली पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांन विरुध्द ५०० शुरवीर महार सैनिकांनी प्रचंड घनघोर युध्द केले. त्यात ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा दारुण पराभव केला. हे जगातल फार मोठ आश्चर्य असुन त्याबद्दल तत्काळीन ब्रिटीशांनी या भिमाकोरेगाव येथील या लढाईच्या स्मरणार्थ आणि महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गौरवासाठी येथे विजय स्तंभ उभारला. या ऐतिहासिक विजय स्तंभाला दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारी रोजी भिमाकोरेगाव ला येऊन या ऐतिहासिक वियज स्तंभाला अभिवादन करुन आंबेडकरी समाजाला आपला गौरवशाली इतिहास हा लढाऊ योध्दयांचा गौरवशाली इतिहास असल्याचे आठवण करुन देत. आपल्या पराक्रमी पूर्वजापासुन प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा उपदेश महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर देत असत.तीच प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी आंबेडकरी जनता पुण्यातील भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन करतात.या लढाईत शहिद झालेल्या शुरविर महार सैनिकांना विनम्र अभिवादन करतात .शुरवीर महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा दारुण पराभव केल्याच्या पराक्रमाची विजय गाथेचा गौरव करताना आज ना.रामदास आठवले यांनी अत्यंत उत्सर्फुत कविता सादर केली.

भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा
आमचा उंच होतो आमचा माथा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,
जो बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा,
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.
असे ना.रामदास आठवले यांनी काव्यमय शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *