प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करून सिंह यांचा “अपमान” केला आहे.

प्रियांका गांधी-वड्रा यांच्या या आरोपानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसवर आरोप केला की, त्यांनी सिंह यांच्या स्मारकासाठी जागा शॉर्टलिस्ट केली होती आणि त्यांच्या कुटुंबालाही त्याबद्दल माहिती दिली होती तरीही काँग्रेस खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना जे पी नड्डा म्हणाले की, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या स्मारक असलेल्या किसान घाटाजवळील जागा डॉ मनमोहन सिंह यांच्या स्मारकासाठी विचारात घेतलेल्या स्थानांपैकी एक आहे.

तर काँग्रेसने इंदिरा गांधी यांचे स्मारक असलेल्या शक्तीस्थळाच्या परिसरात जागा देण्याची मागणी करत ती जागा सुचविली होती. तसेच किसान घाट आणि शक्तीस्थळ दोन्ही स्मारक महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाटापासून फार दूर नाहीत.

शुक्रवारी रात्री, काँग्रेसने आरोप केल्यानंतर, डॉ मनमोहन सिंह यांच्या स्मारकासाठी जागेची विनंती मान्य केली गेली नाही, सरकारने सूचविलेल्या जागेवर ठाम आहे.

एका निवेदनात, गृह मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि डॉ मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना कळवले की, सरकार स्मारकासाठी जागा देईल. यादरम्यान, अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता होऊ शकतात. कारण ट्रस्ट तयार करावा लागेल आणि त्यासाठी जागा द्यावी लागेल, असेही त्यात सांगण्यात आले आहे.

About Editor

Check Also

आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश

वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *