Breaking News

पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रियंका गांधी टीका करत म्हणाल्या, रडणारे नेते… अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सोनिया गांधी यांनी poor lady असे वक्तव्य केल्यावरून भाजपाने काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर त्यास काँग्रेसनेही प्रत्तितुर देत भाजपाला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आज संसदेत विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावरून वक्तव्य करत भाजपावर निशाणा साधला. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वड्रा यांनी आता त्यात उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत खोचक टीका केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सध्या प्रचारसभांचा धुराळा उडत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरूंमुळे आपण काम करू शकत नसल्याचे वक्तव्य केले. तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे काम करू शकत नाही. या दोघांच्या वक्तव्यावरून प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या की, हा निवडणूकीचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न म्हणजे महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांशी लढणाऱ्या जनतेचा हा अपमान आहे. असे रडणारे नेते मी कधीच पाहिले नाहीत अशी खोचक टीका मोदी आणि केजरीवाल यांच्यावर केली.

पुढे बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी म्हणाले की माझ्या आईने राष्ट्रपतींचा अपमान केला. त्यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला तर एका वृद्ध महिलेने दुसऱ्या वृद्ध महिलेविषयी सहाभूती व्यक्त करत बिचाऱ्या राष्ट्रपती थकल्या असतील असे म्हणाल्या. कारण तासभराचे भाषण वाचावे लागत आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे हा निवडणूकीचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न केला. हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचे म्हणाल्या, पण देशातील संघर्ष करणाऱ्या जनतेचा ते अपमान करत आहेत. महागाईमुळे जनता त्रस्त आहे. अनेकांना पेन्शन मिळत नाही. सगळे जण त्रस्त आहेत. पण पंतप्रधान निवडणूकीचा अशा पद्धतीचा मुद्दा बनवीत असल्याची टीकाही यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *