Breaking News

पंतप्रधान मोदींचा काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला तर फडणवीसांचे केले कौतुक पुणे मेट्रोसाठी देवेंद्र फडणवीसच मागे लागलेले होते ते सतत दिल्लीला यायचे

आपल्याकडे अनेक योजनांचे भूमिपूजन तर व्हायचे पण त्याचे उद्घघाटन कधी होईल हे माहित नसायचे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावत पुढे बोलता म्हणाले की, या सुस्त वृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. आता आपल्याला वेगाने काम करायला हवे. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लान बनवला आहे. सरकार, मंत्रालयांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे अनेक वर्षांनंतर एखादी योजना जरी पूर्ण झाली, तरी ती आऊटडेटेड झालेली असते. पीएम गतिशक्ती मास्टर प्लान यावरच काम करणार आहे. तसेच या मेट्रोचे श्रेय देवेंद्र फडणवीसांचे असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

पुणे मेट्रो, १४० इलेक्ट्रिक बसेससह इतर महत्वपूर्ण योजनांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान बोलत होते.

सुदैवाने या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते झाले हे मी सुदैव समजतो. आम्ही नुकतेच म्हणत नाहीतर तर आम्ही करून दाखवतो असेही ते म्हणाले.

नद्या जर पुन्हा जिवंत झाल्या, तर शहरातल्या लोकांना देखील दिलासा मिळेल. शहरातल्या लोकांनी वर्षातला एक दिवस निश्चित करून नदी उत्सव साजरा करायला हवा. संपूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण निर्माण करायला हवे. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या नद्यांचं महत्त्व समजेल असे सांगत ही भूमी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची आहे. काही महिन्यांपूर्वी यांच्या पालखी मार्गांचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

माझे पुणे आणि अशा इतर शहरांना आवाहन आहे जिथे मेट्रोचं काम सुरू आहे. समाजात जे मोठे लोक म्हटले जातात, त्यांना माझा आग्रह राहील, की आपण कितीही मोठे असलो, तरी मेट्रोमधून प्रवास करण्याची सवय समाजातल्या प्रत्येक वर्गाने लावून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

२०१४ पर्यंत फक्त दिल्लीमध्येच मेट्रोचं जाळं होतं. एखाद-दुसऱ्या शहरात मेट्रोचं काम सुरू होत होतं. आज दोन डझन शहरात मेट्रो एकतर चालू झाली आहे, किंवा होणार आहे. यात महाराष्ट्राचं देखील योगदान आहे. महाराष्ट्रात मेट्रोच्या जाळ्याचा वेगाने विस्तार आहे.

असं म्हणतात, की २०३०पर्यंत आपली शहरी लोकसंख्या ६० कोटींहून जास्त असेल. शहरांची वाढती लोकसंख्या आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येते. मात्र, त्यासोबतच आव्हानं देखील असतात. शहरांमध्ये एका निश्चित सीमेमध्येच उड्डाणपुलं होऊ शकतात. किती उड्डाणपुलं बांधाल, कुठे कुठे बांधाल, किती रस्त्यांचं रुंदीकरण आणि कुठे कुठे कराल? अशात आपल्याकडे एकच पर्याय आहे. मास ट्रान्सपोटेशन. अशा व्यवस्थांची जास्तीत जास्त उभारणी व्हायला हवी. यासाठी आमचं सरकार अशा उपायांवर, विशेषत: मेट्रो कनेक्टिव्हिटीकडे लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस जेव्हा इथे मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पासाठी ते नेहमीच दिल्लीला येत असतं. ते या प्रकल्पाच्या पाठिशी लागलेले असायचे. मी त्यांच्या प्रयत्नांचं अभिनंदन करतो असे सांगत फडणवीसांचे कौतुकही केले. पुणे मेट्रो चालवण्यासाठी सौर ऊर्जेचा देखील व्यापक प्रमाणावर वापर होत आहे. दर वर्षी २५ हजार टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळता येईल. पुणे नेहमीच आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध राहिले आहे. तसेच, आयटी क्षेत्रातही पुण्यानं आपली ओळख तयार केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहे. पुणेकरांच्या याच गरजा लक्षात घेता आमचं सरकार अनेक बाबतीत काम करत आहे. मी आत्ताच पुणे मेट्रोमध्ये प्रवास केला. मेट्रोमुळे पुण्यात दळण-वळण सोपं होईल, प्रदूषण आणि ट्रॅफिक जामपासून काहीशी सुटका होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील

फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा

महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता …

Leave a Reply

Your email address will not be published.