Breaking News

विनायक मेटे यांच्या अपघाताची पोलिसांच्या ८ पथकाकडून चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेच पोलिसांची कारवाई

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.

एका मोठ्या ट्रकने विनायक मोटेंच्या गाडीला पाठीमागून धडक दिली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघातानंतर ट्रक निघून गेला. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम करण्यात येत असून तपासानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील, असेही त्यांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल. पण ही झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *