देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर सीआयडी CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. आता चौकशीसाठी एसआयची SIT स्थापन केली. पुढे काय करणार, तर ही केस सीबीआय CBI ला देणार असा खोचक टोला प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही, याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा, असा सल्ला दिला.
पुढे काय करणार ? तर ही केस CBI ला देणार !
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही. ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही ? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा अशी सूचनाही यावेळी केली.