Breaking News

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून राजकिय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर काँग्रेसकडून शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम

मुंबईः प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे काहीशा उशीरानेच सुरु झालेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या शेतकरी संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळ ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चाच काढला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात येणार असल्याचे आताच स्पष्ट झाल्याने अधिवेशनाला आणखी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच राजकिय वातावरण तापण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र योजना जाहीर होवून ६ महिन्याचा कालावधी लोटत असला तरी त्याची अद्याप मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच सरकारने हमीभाव जाहीर करूनही अनेक भागत शेती मालाला राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ही हमी भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा काढला आहे. त्यास चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसकडून राज्य सरकारला शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर घेरण्यासाठी एकट्याने आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या सर्व संघटनांना सोबत घेवून एकच आंदोलन उभारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असल्याचे दिसून यायला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोपर्डी आणि खर्डा येथील बलात्काराच्या प्रकरणात राज्य सरकारने बाजू मांडूनही एका प्रकरणात आरोपींना फाशी झाली. तर दुसऱ्या प्रकरणात दोषी आरोपी मोकाट सुटल्याने मराठा आणि दलित समाजात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर याप्रश्नीही मोठ्या प्रमाणावर राजकारण होणार असल्याने हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असले तरी त्याची राजकीय धग आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, ही राजकारण करण्याची वेळ नाही…

वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर …